Math

Mataji’s North India Padayatra

भुरक्षा यज्ञ पदयात्रा उत्तरभारत मातोश्री पुष्पलताजी पाटील मातोश्री प.पू. पुष्पालताजी पाटील, इंचगेरी मठ, सोलापूर. १०.१.१९५५ साली मातोश्रीचा गुरुपुष्यामृत योगावर जन्म झाला. त्यांच्या आई यमुनाबाई गोविंदराव पाटील भाऊ बाळासाहेब गोविंदराव पाटील दुसरा भाऊ राजेसाहेब गोविंदराव पाटील बहिण सत्यशिला गोविंदराव पाटील गाव भिसे वाघोली ता. जि. लातूर महाराष्ट्र (मराठवाडा) बी.ए. अर्थशास्त्राने पदवी प्राप्त केली. इ.स. १९७२ ला माधवानंद प्रभूर्जीकडून गुरुउपदेश घेतला देवाच एकच प्रवचन ऐकून सर्वस्वाचा त्याग केला. (१९७९) पुढे हुबळी येथील गिरिश आश्रमामध्ये सकाळी देवांना भेटण्यासाठी कुंदगोळ आडनावाचे भक्त आले होते. त्यांनी देवांना प्रवचन सांगा असे म्हणाले त्यावेळी देव (माधवानंद प्रभुजी) म्हणाले, “किती प्रवचन ऐकण्याचेच काम करता ते आचरणात आणा.” हे बघा मातोश्रीकडे बघत म्हणाले ही मुलगी लातूर जिल्ह्यामधली आहे. आपल्या सांप्रदायाचा नांदगाव येथे इंचगिरी मठ आहे. त्या मठात जयराम महाराच्या सप्ताहामध्ये एकच प्रवचन हिने ऐकूण सर्वस्वाचा त्याग करुन ही आश्रमवासी झाली आहे. याला म्हणतात प्रवचन ऐकणे. ऐवढच नाही तर हिच्या आईने ९ लाख रु. देऊन हिला दान केले आहे. त्याचबरोबर डिसेंबर १९७९ ला आचार्य विनोबा भावे यांच्या अखिल भारतीय गोरक्षा संमेलन ब्रम्हविद्या मंदिरला पदयात्रा गेली तेव्हा तेथे देवांनी पुष्पाताईंना व कुमुदिनी ताईना भावेंची मानस पुत्री असणारी प.पु. महादेवी ताई हेगडे यांच्या सोबत ब्रम्हविद्या मंदिर पवनार येथे वास्तव्यास ठेवले २ महिन्यानंतर वापसीच्या वेळी आचार्य भावे प्रत्येकांना संदेश द्यायचे या दोघींना ब्रम्हचारीव्रत पालन करण्याचा संदेश दिला. पुढे इंचगिरीमठात आल्यानंतर हा संदेश ऐकूण प्रभूजींना खूप आनंद झाला. आणि म्हणाले त्यांच्या सोबत माझाही तसाच आशिर्वाद आहे. 

ब्रम्हविद्या मंदिर मध्ये असताना मुरारजी देसाई हे पंतप्रधान आले होते. विनोबांजी आणि त्यांचा सुसंवाद ऐकण्याचे भाग्य त्यांना लाभले. पुढे देवांनी त्याच रात्री पडलेल्या स्वप्नाविषयी चौकशी केली. स्वप्न काय पहले ? ताईनी सांगितले की मोठ्या तळ्यामध्ये कदंबाचं एक झाड होतं त्याची पूजा केली आणि कृष्णाच गांण म्हणत होते. ते गाणं म्हणजे कदंबाच्या झाडाखाली पाणी किती खोल कृष्णा मुरली तुझी गोह रे ।। त्यावेळी त्यांनी सांगितले की पाणी म्हणजे चार कोटी लोकांचा समूह त्या सर्वांची तु आई बनणार आहेस ती त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. आज मुलाला जन्म न देता मातोश्रीही पदवी मिळाली पुढे असेच ऐके दिवशी तुझी प्रकृती एवढी खराब कशी आहे म्हणून आर. बी. पाटील या डॉक्टराकडे घेऊन गेले. त्यांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतली आणि फ्याट गाडीत चार स्त्रीया आणि ड्रायव्हर घेऊन बेंगलोरला पाठविले (म्हैसूर) बेंगलोर मध्ये घेतलेले औषधे टोचून घेतल्यावर स्यिाक्शन झाले व मृत्युच्या जबड्यातुन देवांनी ताईचे प्राण वाचवले म्हैसूरमध्ये स्ट्राईक होता म्हणून देवांनी सांगितल्याप्रमाणे सर्वोदय पदयात्रा कर्नाटक प्रातात होती त्यांना भेटायला त्या गेल्या तेथून परत येऊन आर.बी. पाटील डॉक्टरांना दाखविले कोणालाही रियाक्शनचा शोध लागला नाही. परंतू सद्गुरु माऊलींनी मुगुळघोड मध्ये चनबसप्पा यांच्या शेतात मुक्कामाला होते. त्यांनी त्यावेळी सर्वांनी ताईची चौकशी केली ताई गाडीतच थांबल्या होत्या. आदिनाथ ड्रायव्हरने वाटेतील सर्व हकीकत सांगितली त्यावेळी देव म्हणाले, “डॉक्टरने एका इंजेक्शनाऐवजी १० ठोस दिले ती बरी आहे रियाक्शन झाले तेव्हा मी अदृश्य रुपात तेथेच होतो असे प्रभूजी म्हणाले. अशा प्रकारे देवांनी ताईना वाचविले. ताईचा पूर्नजन्म झाला. त्यांनी १२ वर्ष सर्वोदय पदयात्रा करुन १९९३ पासून गिरीराज मंदिर (इंचगिरीमठ शाखा) नेहरु नगर, विजापूर रोड सोलापूर येथे गुरुआज्ञेनुसार वास्तव्य करीत आहोत. पुढे ९.२.२०११ ला विश्वशांती भारत एकता सत्संग पद्यात्रेचे संयोजकत्व स्थिकारले ६००० कि. मी. उत्तर प्रदेश, दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन, उजैन, नाशिक, हरिद्वार, ऋषिकेश, आयोध्या, काशी ते जबलपूर ते नागपूर, लातूर, सोलापूर व परत इंचगिरी स्थानामध्ये पदयात्रेची सांगता केली. इंचगिरी मठ सोलापूर व नांदगाव मठ लातूर या दोन मठाचे नेतृत्व निरंतर त्या करीत आहोत.